1 more photo
भाजपाच्या कार्यकर्त्यांचे महत्त्व भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असून, कार्यकर्त्यांच्या मतांचा आदर केला जातो. आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या निवडीसाठी पालघर जिल्ह्यातील 128 डहाणू (अनुसूचित जमाती राखीव) विधानसभा मतदारसंघात, मला निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून पसंतीचे तीन उमेदवार निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
4 more photos
ठाण्यातील नौपाडा दिवाळी शॉपिंग फेस्टिवलचे उद्घाटन गोखले रोडवरील पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात भव्य शॉपिंग फेस्टिवलला सुरुवात झाली. गोखले रोड विविध प्रकारच्या विद्युत रोशनाई व दिव्यांनी सुंदर सजवण्यात आला आहे. जवळपास पन्नास वर्षांनंतर नौपाडा शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे दिवाळीपूर्वीचा आनंद वाढला आहे.
2 more photos
पर्व विकासाचे, ठाणेकरांच्या हक्काचे! आज हिरानंदानी ईस्टेट पाटलीपाडा येथील रहिवाशांशी संवाद साधला व समस्यांवर चर्चा केली. यात ठामपाकडून अनियमित पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, ट्रॅफिकची समस्या, ज्येष्ठ नागरिकांच्या आसन व्यवस्थेसह लँड कन्व्हेन्ससारखे महत्त्वाचे मुद्दे चर्चेत आले. हिरानंदानी सोसायटीतील रस्ते व दिशादर्शक बोर्डांसाठी लोकसहभागातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. उपस्थित नागरिकांनी आभार व्यक्त केले.
Office of Sanjay Kelkar, MLA Thane (148): Deep Jyoti, Veer Savarkar Marg, Naupada, Thane (W) 400602 · 022 2533 3850
Copyright © Sanjay Kelkar 2026. All rights reserved.

