2 more photos
विधानसभा निवडणूक उमेदवारीची घोषणा होताच आज अनेक हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. ज्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आईचा आशीर्वाद. "संजय, माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. अशीच जनसेवा तुझ्या हातून घडत राहो, आशीर्वाद रुपी शुभेच्छा." या शब्दांनी मी सुखावलो. मातृशक्तीच्या आशीर्वादाने मिळालेले हे बळ पुन्हा एकदा जनसेवेसाठी समर्पित करेन याची ग्वाही देतो.
6 more photos
'सकाळ एक्सलेन्स इन इंजिनिअरिंग अवॉर्ड' सोहळा थाटात पार पडला, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील अभियंत्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना, पुढील पिढीच्या भविष्याचा विचार करून राजकर्त्यांनी दूरदृष्टीने नियोजन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. निवडणूक आणि मतदानापलीकडे जाऊन, विकासकामांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. महायुती सरकारने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन (एमएमआर) साठी पुढील 25 वर्षांचे नियोजन केले असल्याचे नमूद केले गेले. शहराच्या विकासात अभियंत्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते, ज्यामुळे शहराची ओळख निर्माण होते, असेही विचार मांडले.
3 more photos
एस. डी. मोटर्स, आंबेडकर रोड, ठाणे येथे उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहून उद्घाटन केले आणि संचालक श्री. गितेश माने यांना शुभेच्छा दिल्या. ठाण्यातील पहिले थ्री व्हीलर इलेक्ट्रिक टेम्पो येथे उपलब्ध आहे. इंधन बचत व प्रदूषण टाळण्यासाठी इलेक्ट्रिक टेम्पो कसे उपयुक्त ठरू शकते याबाबत माहिती घेतली. उद्घाटनाच्या प्रसंगी परिवहन श्री. सदस्य विकास पाटील व श्री. मीतेश भाई यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
1 more photo
ठाण्यातील 'समतोल फाउंडेशन' तर्फे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सहभागी होऊन अन्नदानाची सेवा दिली. या उपक्रमाचे संस्थापक श्री. विजय जाधव यांनी गेल्या 2,255 दिवसांपासून अविरतपणे अन्नदान सुरू ठेवले असून, 6 लाख 38 हजार गरजू लोकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. उपक्रमादरम्यान, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधला, ज्यांनी या अन्नदानाबद्दल समाधान व्यक्त केले. लॉकडाऊनच्या काळापासून समतोल फाउंडेशनने हा स्तुत्य उपक्रम अविरतपणे चालू ठेवला आहे.
3 more photos
ठाण्यातील वर्धमान वाटिका को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, मानपाडा येथे ओपन एअर जिम बसवण्याचा आणि बेंचेस वाटपाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. ओपन एअर जिमसाठी भूमिपूजन करण्यात आले, ज्यावेळी सोसायटीचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानपाडा परिसरातील नागरिकांनी आमदार निधीतून केलेल्या विविध कामांविषयी समाधान व्यक्त केले.
2 more photos
ठाण्यातील ऋतू पार्क येथे ओपन जिमचे उद्घाटन करण्यात आले, ज्यामध्ये छत असल्याने पावसाळ्यातही व्यायाम करता येणार आहे. या जिममुळे सर्व वयोगटातील नागरिकांना वर्षभर व्यायामाची सोय झाली आहे. आमदार निधीतून ठाण्यात 20 ओपन जिम आणि 400 सोसायट्यांमध्ये बेंचेस व कचरा ट्रॉल्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून अधिकाधिक लोकांचा लाभ होईल.
Office of Sanjay Kelkar, MLA Thane (148): Deep Jyoti, Veer Savarkar Marg, Naupada, Thane (W) 400602 · 022 2533 3850
Copyright © Sanjay Kelkar 2026. All rights reserved.

