+022 25333850 sanjaykelkar09@gmail.com
Sanjay Kelkar – BJP MLA, Thane
  • About
    • About Me
    • About BJP
  • Projects
    • Completed Project
    • Upcoming Projects
  • Vidhan Sabha
  • Gallery
    • Photo
    • Video
  • Media Coverage
    • News Paper
    • Videos
  • Contact Me
#Donate

माझे विचार

कधी कधी मोठी माणसं जवळ गेल्यावर लहान वाटतात,
तर लहान माणसं मोठी भासतात...
आणि काही मोठी माणसं — खरंच मोठी असतात.

गोड बोलणं हे चांगुलपणाचं लक्षण असतंच असं नाही;
कधी कधी थोडं कटू, पण स्पष्ट बोलणारे लोक
मनानं अधिक प्रामाणिक आणि निष्कपट असतात.

प्रत्येकाला त्याच्या लायकीप्रमाणेच मिळतं असं नाही.
काहींना क्षमतेपेक्षा अधिक मिळतं —
पण लायक व्यक्ती त्याचं मूल्य जाणते,
आणि लायक नसलेली व्यक्ती फक्त त्याचा उपभोग घेते.

स्वतःच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी
कधी कधी जवळच्या व्यक्तींचाही विश्वासघात केला जातो,
आणि ज्यांच्यावर विश्वास टाकतो, तेच धोका देऊन जातात.

नेहमी सत्य बोलावं —
कारण खोटं बोलल्यावर ते आठवून सांगावं लागतं,
पण सत्य बोलल्यावर काहीच आठवावं लागत नाही.

माणूस कोणत्याही पदावर असला तरी,
‘पोज’ घेऊ नये — ती टिकवण्यासाठी
अहंकार आणि इतर विकार जडतात.
माणूस म्हणून राहणं — हेच सर्वांत मोठं स्थान आहे.

प्रतिष्ठेची सवय ही चटक बनता कामा नये.
ती अहंकार आणि द्वेष वाढवते;
नम्रता मात्र माणसाला उंचीवर नेते.

कुठल्याही क्षेत्रात सातत्याने काम करणं जितकं महत्त्वाचं आहे,
तितकंच थांबणं, थोडं मागे वळून पाहणं,
हेही तेवढंच गरजेचं आहे.

चुका फक्त काम करणारेच करतात —
निष्क्रिय माणसं ना काम करतात, ना चुका.

मनात राग आणि दुःख असताना घेतलेले निर्णय
बहुतेक वेळा चुकीचे ठरतात;
शांत आणि स्थिर मनच योग्य निर्णय घेऊ शकतं.


— आमदार संजय केळकर

Not available right now

Facebook

Sanjay Kelkar

X (Twitter)

Sanjay Kelkar @sanjaykelkar_

Follow on X for the latest updates, announcements and work in Thane.

Follow on X View posts on X →

Instagram

About Sanjay Kelkar Completed Works in Thane Upcoming Projects Initiatives Ahval Reports Photo Gallery Videos In the News Manifesto Contact

Office of Sanjay Kelkar, MLA Thane (148): Deep Jyoti, Veer Savarkar Marg, Naupada, Thane (W) 400602 · 022 2533 3850

Copyright © Sanjay Kelkar 2026. All rights reserved.